Tue, Apr 23, 2019 06:19होमपेज › Sangli › हॉटेलची तोडफोड; दोघांना अटक

हॉटेलची तोडफोड; दोघांना अटक

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:43AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

गुंड रमेश कोळी याचा खून होत असताना तुम्ही मध्यस्थी का केली नाही असा जाब विचारत चौघांनी कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँडमध्ये घुसून व्यवस्थापकाला मारहाण करीत तोडफोड केली. शिवाय गल्ल्यातील दहा हजारांची रोकड लांबविली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी गुंडा विरोधी पथकाने आणखी दोघांना अटक केली आहे.  
निखील सुनील गाडे (वय 27), गणेश बाबासाहेब सातपुते (वय 30, दोघेही रा. रमामातानगर, सांगली) अशी आज अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी यापूर्वी योगेश कुंभार, प्रशांत पवार यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. याप्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक इम्रान मेहबूब कनवाडे (वय 31, रा. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार रमेश कोळीचा पूर्ववैमनस्यातून गुंड रवि खत्रीसह चौघांनी दगडाने डोके ठेचून खून केला होता. कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँडसमोर ही घटना घडली होती. 

हॉटेलसमोर घटना घडली असताना तुम्ही त्यात मध्यस्थी का केली नाही तसेच रमेशला का वाचवले नाही असा जाब विचारत चौघे हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी व्यवस्थापकाला मारहाण करीत तेथील काऊंटर, खुर्च्या, टेबलची तोडफोड केली. त्यानंतर गल्ल्यातील दहा हजारांची रोकड घेऊन तेथून निघून गेले.  गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, महेश आवळे, मेघऱाज रूपनर, सागर लवटे, योगेश खराडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.