Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Sangli › हवालदार ठाकूर अखेर निलंबित

हवालदार ठाकूर अखेर निलंबित

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:22AMसांगली : प्रतिनिधी

मिरजेतील मेडिकल व्यावसायिक अभिजित पाटील याच्यासह त्याच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेला पोलिस हवालदार साईनाथ ठाकूर याला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ठाकूर मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.   अभिजितचे वडील विजयकुमार पाटील यांनी महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अभिजित याला त्याच्या वडिलांना व आईला व्यवसायासाठी पंडित नाईक व बेबी अंडीकाट यांनी एकदा 15 लाख व 18 लाख रुपये 10 टक्के व्याजाने कर्ज दिले होते. त्यासाठी लक्ष्मी निवास तिवारी यांनी मध्यस्थी केली होती.

सन 2015 पासून व्याजासाठी सावकारांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. दि. 30 ऑक्टोबर रोजी अभिजितने घरातच विषारी औषध  प्राशन करून आत्महत्या केली होती. चार महिन्यांपूर्वी अभिजितची पत्नी कल्याणी हिनेही   घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सावकार पंडित बळवंत नाईक, लक्ष्मीनिवास भूषण प्रसाद तिवारी (दोघे रा. जयसिंगपूर), बेबी मोहन अंडीकाट (रा. झारीबाग, मिरज) यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर या प्रकरणात आता हवालदार ठाकूर याच्यावरही गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.