Sat, Apr 20, 2019 08:46होमपेज › Sangli › तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:44AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

एका अभियंत्याने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. किरण हणमंत राऊत (वय 27, रा. बलवडी, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. किरण राऊत आई-वडिलांसोबत बलवडी (ता. सांगोला) येथे राहत होता. तो यांत्रिकी अभियंता होता. पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. एक महिन्यांपूर्वीच तो नोकरी सोडून गावी परतला होता. 

 मंगळवारी  त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्याला सांगलीतील  रूग्णालयात दाखल केले होते.  शुक्रवारी दुपारी जवळ कोणीही नसल्याचे पाहून तो रूग्णालयातून निघून गेला. रूग्णालयाच्या शेजारी असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर तो गेला. तिसर्‍या मजल्यावरून त्याने खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.