होमपेज › Sangli › जिल्हा बँक राज्यात ‘नंबर वन’; 73 कोटींचा नफा

जिल्हा बँक राज्यात ‘नंबर वन’; 73 कोटींचा नफा

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या निकषांनुसार सांगली जिल्हा बँक राज्यातील जिल्हा बँकांमध्ये प्रथम आली आहे. सन 2017-18 या आर्थिक वर्षात बँकेला 73 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. ‘एनपीए’चे प्रमाणही कमी झाले आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पाहता  जिल्हा बँक ‘साऊंड’ अँड ‘स्ट्राँग’ झाली आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  जिल्हा बँकेने राज्यात ‘नंबर वन’ पटकावल्याबद्दल अध्यक्ष दिलीपराव पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा ज्येष्ठ संचालक विलासराव शिंदे यांनी सत्कार केला.

संचालक सी. बी. पाटील, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, कमलताई पाटील, श्रद्धा चरापले, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, बँकेचे सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील, जे. जे. पाटील, सुधीर काटे, सतीश सावंत, गिरी उपस्थित होते.  पाटील म्हणाले, नोटाबंदीनंतर 8 महिने जिल्हा बँकेत 315 कोटी रुपये पडून राहिले. त्यावरील व्याजाचे 21.63 कोटी नुकसान झाले. 14.72 कोटी रुपयांवरील व्याजाचे 1.14 कोटी नुकसान झाले. पीक कर्ज वितरणात 21 कोटींचे नुकसान झाले आहे. आरबीआय, शासनाच्या अन्यायी धोरणामुळे बँकेला 43.77 कोटींचे नुकसान झाले. तरीही बँकेने 73 कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे.

निव्वळ नफा 30 कोटींपर्यंत जाईल. सोसायट्या, संस्था, कर्मचारी व अन्य बाबींवर तरतूद केली जाईल. बँकेचा ढोबळ ‘एनपीए’चे प्रमाण 13.1 टक्क्यावरून 11.6 टक्केपर्यंत खाली आले आहे. सन 2018-19 मध्ये ‘एनपीए’ वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. दिलीपराव पाटील म्हणाले,..! 1) विकास सोसायट्यांना अनिष्ट तफावतीतून बाहेर काढणार. 2) दीड लाख शेतकर्‍यांना रुपे डेबिट कार्ड, 1.67 लाख शेतकर्‍यांना केसीसी कार्डचे वितरण. पॉज व ई-कॉमर्स सुलभ. 4)तत्काळ पेमेंट, मिसकॉल अलर्ट, नेट बँकिंग सुविधा देणाार. जिल्हा बँकेत 465 पदे रिक्‍त आहेत. नोकरभरतीसाठा टाळाटाळ करत नाही.  मात्र अन्य काही जिल्हा बँकेच्या नोकरभरतींना स्थगिती आल्याने सावधगिरी अवलंबतोय. जिल्हा बँकेला, संचालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतोय. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल.
 

 

 

tags : Sangli,news,Sangli district bank  Number One Bank in the state