Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Sangli › बीओटी गुंडाळली; झेडपी बांधणार गाळे

बीओटी गुंडाळली; झेडपी बांधणार गाळे

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:11AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने मोक्याच्या जागांचे ‘बीओटी’वर विकसन करण्याचा विचार गुंडाळून ठेवत आष्टा, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, शिराळा येथील मोक्याच्य जागा अनामत रकमेतून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांवर व्यापारी संकुल बांधून दुकान गाळे भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.  जिल्हा परिषदेच्या जागांचे विकसन व स्वीय निधी उत्पन्नवाढीसंदर्भात नियुक्त विशेष समितीची बैठक शुक्रवारी झाली. अध्यक्षस्थानी संग्रामसिंह देशमुख होते.

या विशेष समितीचे सदस्य काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख, पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड, सदस्या आशाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे उपस्थित होते. 

मनपाच्या ‘बीओटी’चा धसका महापालिकेमुळे ‘बीओटी’ हा पर्याय बदनाम झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचीही बदनामी होऊ नये यासाठी ‘बीओटी’ला बगल देण्याचा निर्णय झाला. जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल, ऑफीस कार्यालये जिल्हा परिषद स्वत: बांधणार आहे. अनामत रक्कम घेऊन त्यातून बांधकाम करून ते भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला. कवठेमहांकाळ धर्मशाळा करार रद्द कवठेमहांकाळ येथील धर्मशाळेची जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. मात्र जागा शासनाच्या नावावर आहे. लिलावाद्वारे ही धर्मशाळा एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र हा करार रद्द करण्याचा निर्णय झाला. ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करून विकसित करण्याचा निर्णय झाला. 

बीओटीच्या ‘त्या’ फाईलला 10 वर्षांनी पुर्णविराम कवठेमहांकाळ येथील एक जागा बीओटीतून विकसित करण्याचा निर्णय सन 2008 मध्ये झाला होता. मात्र ही जागा जिल्हा परिषदेच्या नावावर नसल्याने ‘बीओटी’चा ठराव रद्द करण्याचा निर्णय झाला. या जागेवरही जिल्हा परिषदेचे नाव लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ही जागाही जिल्हा परिषद स्वत: विकसित करणार आहे.