Tue, Nov 13, 2018 06:21होमपेज › Sangli › व्हॉट्सअ‍ॅपवर बदनामीकारक मजकूर

व्हॉट्सअ‍ॅपवर बदनामीकारक मजकूर

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी राज्यात गाजत असतानाच एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या घटनेसह अनेकांची बदनामी करणारा मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली आहे. याप्रकरणी भूपेश चंदाणे याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मेसेजमुळे शहरात खळबळ उडाली आहे.  

याप्रकरणी अनिकेतचा भाऊ आशिष अशोक कोथळे याने फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अनिकेतच्या खूनप्रकरणी एक मेसेज टाकण्यात आला. यामध्ये खुनानंतर सांगलीत घडलेल्या घटनांवर टीकात्मक भाष्य करण्यात आले आहे. त्याशिवाय अनिकेतबाबतही बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला आहे. रविवारी हा मेसेज निदर्शनास आल्यानंतर 
आशिष कोथळेने सांगली शहर पोलिस ठाणे गाठून याबाबत कुटुंबियांच्या तसेच भावना दुखावल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदाणे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा मेसेज आज दिवसभर सांगलीत फिरत होता. त्यातील मजकुरामुळे शहरात याची जोरदार चर्चा सुरू होती. 

दरम्यान पोलिसांनी याबाबत दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची गरज होती. पण त्यांनी तो केला नाही. त्यामुळे याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आशिष कोथळे यांनी सांगितले.