Thu, Jul 09, 2020 09:25होमपेज › Sangli › कोयता घेऊन फिरणार्‍या गुन्हेगारास अटक

कोयता घेऊन फिरणार्‍या गुन्हेगारास अटक

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:48PM

बुकमार्क करा


सांगली ः प्रतिनिधी

खुनाचा प्रयत्न, चोरी, वाटमारी, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारास कोयता घेऊन फिरताना अटक करण्यात आली. सलमान कमरूद्दीन मुल्ला (वय 22, रा. राजूनगर, सटाले मळा) असे त्याचे नाव आहे. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कारवाई केली.  निरीक्षक भिंगारदेवे यांच्यासह पोलिसांचे एक पथक शुक्रवारी पहाटेपासून गस्त घालत होते. चिन्मय पार्कजवळ ते आल्यानंतर त्यांना पाहून सलमान पळून जाऊ लागला.

त्यानंतर पथकाने त्याचा पाठलाग करून पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला लावलेला धारदार कोयता आढळून आला. त्याच्याविरोधात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक भिंगारदेवे यांच्यासह जावेद मुजावर, गजानन गोसावी, सचिन महाडिक, सूरज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.