Tue, Apr 23, 2019 07:54होमपेज › Sangli › छोट्या बाबरसह दोघांना अटक

छोट्या बाबरसह दोघांना अटक

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 11:45PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरात शंभर फुटी रस्ता आणि झुलेलाल चौकात झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर व त्याचा पुतण्या रोहित बाबर यांना अटक केली. दोघांनाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सोमवारी ( दि. 4) राहुल बाबरसह त्याच्या दहा साथीदारांनी भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून किरण भंडारे याला जातीवाचक शिवीगाळ करीत  खुनी हल्ला केला होता.

यामध्ये किरण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी राहुल बाबर, मेघशाम जाधव, धनंजय भोसले, विनायक निकम (सर्व रा. शामरावनगर, सांगली) या चौघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी गुंड छोट्या बाबरने किरकोळ कारणावरून अब्दुल रशीद शेख याच्यावर चाकूने  हल्ला केला होता. यामध्ये शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावरही सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुंड छोट्या बाबरसह तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.