Sun, May 26, 2019 19:31होमपेज › Sangli › सांगली : विट्यात तिघांवर तलवार हल्ला

सांगली : विट्यात तिघांवर तलवार हल्ला

Published On: Aug 07 2018 5:54PM | Last Updated: Aug 07 2018 5:54PM विटा : प्रतिनिधी

 विटा (ता.खानापूर) येथे भरदिवसा झालेल्या रस्त्यावरील किरकोळ वादातून तिघांवर तलवार हल्ला झाला आहे.  चारचाकी गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी तिघांवर तलवार,लोखंडी पाईपने मारहाण करून पसार झाले आहेत. 

किरकोळ वादाचे रूपांतर हल्ल्यात होवून मधुकर भिवाजी वाईदंडे (वय ३५), निशा मधुकर वाईदंडे (वय २५ ) आणि मोहन भिवाजी वायदंडे (वय ४५),  तिघे (रा.पंचशीलनगर, विटा )  अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी हास्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.