Sat, Apr 20, 2019 08:22होमपेज › Sangli › सांगली :   सलग चौथ्‍या दिवशी दूध संकलन बंद 

सांगली :  आरवडेत दूध रस्त्यावर ओतले 

Published On: Jul 19 2018 4:06PM | Last Updated: Jul 19 2018 4:06PMमांजर्डे : वार्ताहर

दूध दरवाढीसाठीचे आंदोलन हिंसक होताना दिसत आहे. आरवडे (ता.तासगाव) येथील शेतकऱ्यांनी चितळे डेअरीच्या गाडीतील 1500 लिटर दूध रस्त्यावर ओतले.  चौथ्या दिवशी सुद्धा या भागात दूध संकलन बंद ठेवण्यात आले.

चितळे डेअरीची टाटा गाडी सावळज भागातील दूध संकलन करून आरवडे मार्गे भिलवडीकडे चालली होती. याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी सदरची गाडी आरवडे बस स्थानकावर अडवली व त्यामधील अंदाजे 1500 लिटर दूध रस्त्यावर ओतले.

आरवडे भागातील एक थेंबही दूध बाहेर जाऊ देणार नाही,जर कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाच तर ते रस्त्यावर ओतू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.यावेळी दुधदरवाढ तात्काळ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.दरम्यान या भागातील आरवडे, मांजर्डे, पेड,बस्तवडे, बलगवडे,  या भागातही आज पूर्णपणे दूध संकलन बंद होते.