Tue, Nov 20, 2018 21:39



होमपेज › Sangli › ‘दै. पुढारी कस्तुरी क्लब’चा आज अंकलीत ‘होम मिनिस्टर’

‘दै. पुढारी कस्तुरी क्लब’चा आज अंकलीत ‘होम मिनिस्टर’

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 9:17PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ ‘कस्तुरी क्लब’ च्या वतीने आज (शनिवारी)महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आदिनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ, कुंभार गल्ली, अंकली येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम महिलांसाठी खुला आहे. यावेळी टोमॅटो एफएमवरील बाबूराव महिलांशी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यक्रम स्थळी कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू राहणार आहे. 

अंकली व परिसरातील महिलांना ‘होम मिनिस्टर’ बनण्याची संधी आज मिळणार आहे. आपले कौशल्य आणि जनरल नॉलेज दाखवून ‘होम मिनिस्टर’ होण्याची संधी ‘दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब’ च्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी टोमॅटो एफएमवरील बाबूराव विविध खेळ घेणार असून विजेत्या ठरलेल्या चार भाग्यवान ‘होम मिनिस्टर’ ला ‘दडगे बंधू’ यांच्याकडून डिझायनर साड्या, व्हीएलसीसी यांच्याकडून पाच महिलांना 500 रुपयांचे सर्व्हिस कुपन तसेच ‘महालक्ष्मी आटा चक्की’ यांच्याकडून पहिल्यांदा कस्तुरी सभासद होणार्‍या 25 कस्तुरी सभासदांना डिस्काऊंट कुपन यावेळी देण्यात येणार आहेत. 

कस्तुरी क्लब सभासद नोंदणी फी 500 रुपये असून सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. तसेच कस्तुरींना वर्षभर विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत. दि सोलर शॉप 15%, शिवशंभो आटाचक्की 20%, सन फ्लेम एनर्जी सिस्टम 5 ते 25 %, दडगे बंधू 40%, इलिक्झर (स्पोकन इंग्लिश क्लासेस) 50%, हॉटेल द ग्रेट सिझन 15%, कॉन्टाकेअर आय हॉस्पिटल 10 ते 30%, फेमिनाईन ज्वेलर्स 10 ते 20 %, लाईफ फोर्स फिटनेस जिम 50%, नॅचरलस ब्युटी सलून 20%, भविष्यवेध 10 ते 20%, सागर एजन्सी 10 ते 15 %. कार्यक्रमाच्या माहितीसाठी संपर्क : सौ. गीतांजली उपाध्ये (नेमिनाथनगर) मोबा. 9823901008, सौ. संजीवनी पाटील मोबा. 9422315495. अधिक माहितीसाठी संपर्क पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली-मिरज रोड, सांगली, सौ. गीतांजली पाटील मोबा. 8805007176.