Tue, Mar 19, 2019 11:59होमपेज › Sangli › एजंट धीरजला अटक

एजंट धीरजला अटक

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 11:57PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य एजंट धीरज बाळासाहेब पाटील (वय 22, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) याला अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांच्या पथकाने पुण्यातील चतुश्रुंगी परिसरात ही कारवाई केली. 

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. मलेशियात नोकरीसाठी पाठविलेल्या तरुणांनी नातेवाईकांना वेटरची नोकरी मिळाल्याचे तसेच टुरिस्ट व्हिसा दिल्याचे सांगितले होते. वर्किंग व्हिसा नसल्याने तसेच टुरिस्ट व्हिसाची मुदत संपल्यानंतर चार तरुणांना 
मलेशियन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

वर्किंग व्हिसा दिला नसल्याचे तरूणांनी सांगितल्यानंतर तरूणांच्या नातेवाईकांनी पोलिसपुत्र कौस्तुभ पवारकडे तगादा लावला होता. त्यानंतर कौस्तुभने धीरजकडे तगादा लावला होता. त्यानंतर कौस्तुभ व धीरज दोघेही गायब झाले होते. व्हिसाची मुदत संपल्याने चारही तरूणांना तेथील पोलिसांनी अटक केली होती. त्यावर दि. 12 डिसेंबरला सुनावणी झाली. त्यात चौघांनाही तीन महिन्यांची शिक्षा झाली. त्याचदिवशी पोलिसपुत्र कौस्तुभला अटक करण्यात आली.   

त्यानंतर पोलिस धीरज पाटीलच्या शोधात होते. नुकताच पोलिसांनी धीरजच्या घरावर छापा टाकला होता. तो मलेशियाला पळून जाणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांना तो पुण्यात असून तेथून मलेशियात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने उपनिरीक्षक समीर चव्हाण यांचे एक पथक पुण्याला रवाना केले.  

रविवारी सकाळी चतुश्रुंगी परिसरात तो आल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी त्याला घेऊन पथक सांगलीत पोहोचले. रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.