होमपेज › Sangli › मुलावर लैंगिक अत्याचार; तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी

मुलावर लैंगिक अत्याचार; तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 11:39PM

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय 35, रा. तडवळे, ता. आटपाडी) याला  दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटनेकर यांनी सोमवारी सुनावली. सरकारपक्षातर्फे सौ. आरती साटविलकर-देशपांडे यांनी काम पाहिले. पीडित मुलगा दि. 1 ऑगस्ट 2016 रोजी वैरण आणण्यासाठी त्याच्या नातेवाइकासोबत शेतात गेला होता. लक्ष्मण गिड्डे याने त्याला काम असल्याचे खोटे सांगून घरात बोलावून घेतले. त्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याला घरातून हाकलून दिले. मुलाने घडलेली घटना वडिलांना सांगितली. त्यावेळी मुलाचे वडील व चुलते यांनी लक्ष्मण गिड्डे  याच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी  मुलाच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली.