Thu, Mar 21, 2019 11:08होमपेज › Sangli › आव्हान समजून नागठाणे ग्रामसचिवालय उभे करूया 

आव्हान समजून नागठाणे ग्रामसचिवालय उभे करूया 

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 11:21PMवाळवा : प्रतिनिधी

स्व. पतंगराव कदम यांचे नागठाणे ग्रामसचिवालय बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपण विरोधकांनी आव्हान समजून सारे एकत्र येऊन पूर्णत्वास नेवूया, असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी नागठाणे येथे बोलताना केले.

नागठाणे (ता. पलूस) येथे नागठाणे ग्रामसचिवालय, नागठाणे-सूर्यगाव रस्त्याचे डांबरीकरण, नागठाणे-नागराळे रस्ता डांबरीकरण, गणेशनगर पेव्हिंग ब्लॉक, दलित वस्ती नागठाणे पेव्हिंग ब्लॉक, नागेश्‍वर मंदिर विकासकाम अशा 1 कोटी 25 लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

माजी आ. पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, शरद लाड, सभापती सीमाताई मांगलेकर,  अश्‍विनी पाटील,  नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, सुरेंद्र चौगुले आदींच्या हस्ते करण्यात आले. 

देशमुख म्हणाले,  विकासकामासाठी एकत्र यावे.   गेल्या वर्षभरात जि.प. च्या माध्यमातून सुमारे 700 कोटींचा निधी विकासकामांसाठी वापरला आहे. जिल्हा भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, विरोधकांनी सुडाचेच राजकारण केले. आम्ही मात्र विधायक विकासाचे काम केले.  डॉ. पतंगराव कदम आणि आम्ही टोकाचा संघर्ष केला. मात्र एकमेकाची कपडे फाडली नाहीत.  

जि.प. चे गटनेते शरद लाड,   गोपीचंद पडळकर यांची भाषणे झाली. सीमाताई मांगलेकर यांनी स्वागत केले. तर तालुका भाजपचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश मांगलेकर, उपसभापती अरुण पवार, ग्रा.पं. सदस्य भीमराव शिंदे, पोपट शिंदे, गीतांजली गुरव, भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जयवंत मदने यांनी आभार मानले. 

Tags : Sangli Zilla Parishad President Sangram Singh Deshmukh