Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Sangli › जि. प. स्वीय निधीचे 20 कोटी अखर्चित राहणार

जि. प. स्वीय निधीचे 20 कोटी अखर्चित राहणार

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 9:47PMसांगली  :  प्रतिनिधी

जिल्हा परिषद स्वीय निधीच्या महसुली व भांडवली जमा-खर्चाच्या बजेटमधील  सुमारे 20 कोटी रुपये अखर्चित राहतील, असे संकेत मिळत आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास एक महिना उरला आहे. अकरा महिन्यात केवळ 21 टक्के खर्च झाला आहे. नाकर्तेपणामुळे शिलकीची परंपरा पुढे चालू राहणार असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद स्वीय निधीचे सन 2017-18 चे मूळ अंदाजपत्रक 34 कोटी रुपयांचे होते. मार्च 2017 मध्ये  हे अंदाजपत्रक तयार झाले होते.

त्यानंतर दि. 17 जुलै 2017 रोजी हे अंदाजपत्रक प्रथम सुधारित झाले. हे प्रथम सुधारित अंदाजपत्रक 69.80 कोटी रुपयांचे आहे. महसुली जमा 53 कोटी आणि भांडवली जमा 16 कोटी निधीचे हे बजेट आहे. महसुली जमा 53 कोटी रुपयांपैकी सुमारे 11 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. खर्चाचे प्रमाण 21 टक्के आहे. 20 कोटी रुपये अखर्चित राहण्याचे संकेत आहेत. मार्च महिन्यात गडबडीत खर्चाची लगबग यावेळीही दिसून येईल.

  • विभागनिहाय खर्च  ग्रामपंचायत :- 27 टक्के  शिक्षण:- 17 टक्के.  
  •  बांधकाम :- 38 टक्के.   लघुपाटबंधारे :- 41 टक्के.  
  •  आरोग्य :- 17 टक्के   पाणी व स्वच्छता :- 26 टक्के 
  •  कृषी :-  12 टक्के   पशुसंवर्धन :- 25 टक्के
  •  समाजकल्याण :- 16 टक्के

निधी अखर्चित राहिल्यास खातेप्रमुख जबाबदार: देशमुख

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संंग्रामसिंह देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद स्वीय निधी तसेच राज्य व केंद्र शासनाचा निधी मुदतीत खर्च न झाल्यास संबंधित खातेप्रमुख जबाबदार राहतील. सध्या कमी खर्च दिसत असला तरी बराचसा निधी खर्चाच्या प्रक्रियेेेत आहे. निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.