होमपेज › Sangli › दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपये 

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपये: पडळकर 

Published On: Dec 01 2017 5:11PM | Last Updated: Dec 01 2017 5:11PM

बुकमार्क करा

विटा: विजय लाळे

सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. हा निधी लवकरच ग्रामपंचायतींना दिला जाईल. यातील खानापुर मतदार संघासाठी तब्बल 4 कोटी 55 लाख 75 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिली. 

पडळकर म्हणाले, आपण सभापती झाल्यापासून समाज कल्याण विभागाचा एक रुपया निधी सुद्धा माघारी गेला नाही उलट आणखी 20 कोटी निधी मिळावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जो निधी खर्च करत आहे यात कसल्याही प्रकारचे राजकारण नाही ज्या गावांची मागणी आहे आणि जेथे गरज आहे अशा गावात सत्ता कोणत्या पक्षाची आहे हे न पाहता निधीचे वाटप होत आहे. ही कामे दर्जेदार होण्याच्या द्रुष्टीने स्थानिक ग्रामपंचायत आणि तेथील पदाधिकार्यानी तसेच लोकांनी विशेष दक्षता घ्यावी. खानापुर मतदार संघात खानापुर तालुका 1 कोटी 60लाख , आटपाडीसाठी 2 कोटी 24लाख आणि विसापूर मंडळासाठी 71 लाखांच्या निधिचा समावेश आहे. 

ते म्हणाले,  आंतरजातीय विवाहासाठी अडीच लाख रुपये मदत, दिव्यंग आणि अव्यंग लोकांसाठी 50हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. शिवाय लघु उद्योगांसाठी 1 लाख 50 हजार रुपये बीज भांडवल म्हणून देण्यात येणार आहे असे ही पडळकर यांनी सांगितले.