होमपेज › Sangli › सांगली : मराठा क्रांती मौर्चामुळे ' विटा बंद ' (video)

सांगली : मराठा क्रांती मौर्चामुळे ' विटा बंद ' (video)

Published On: Jul 24 2018 1:48PM | Last Updated: Jul 24 2018 2:27PMविटा : प्रतिनिधी

 आक्रमक झालेल्या मराठा समाज बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणा साठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला. आज  मंगळवारी सकाळी हजारो तरुणांनी विटा शहरातून मोटार सायकलने रॅली काढून विटा बंद केले. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

यास प्रतिसाद देत विटेकर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणत्याग करणाऱ्या काकासाहेब शिंदे पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. नगरसेवक अमोल बाबर,  शंकर मोहिते ,  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील,  यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांना शहर बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. 

यावेळी सुनील पाटील,  विजय पाटील, शंकर मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक अमोल बाबर, शिवाजी शिंदे,  विजय पाटील,   शंकर मोहिते, महेश बाबर,अमित भोसले, विजय सपकाळ, नगरसेवक रवींद्र कदम, दहावीर शितोळे, विकास जाधव, पांडुरंग पवार, समीर कदम, यांच्यासह सराफ असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी, तालुका आणि शहरातील समाज बांधव उपस्थित होते.