Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Sangli › सांगली : क्वॉलिटी पॉवर कंपनीच्या रखवालदारावर चोरट्यांचा हल्ला 

सांगली : क्वॉलिटी पॉवर कंपनीच्या रखवालदारावर चोरट्यांचा हल्ला 

Published On: Sep 12 2018 2:15PM | Last Updated: Sep 12 2018 2:14PMकुपवाड : वार्ताहर 

कुपवाड औद्योगिक वसाहत मधील क्वॉलिटी पॉवर कंपनीमधील रखवालदार दाजी नाना गोरे(वय-४५,रा.अहिल्यानगर, कुपवाड) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री चोरट्याने तीक्ष्ण हत्याराने प्राण घातक हल्ला करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात कामगारांच्या खोलीत डांबून ठेवून चोरट्याने पलायन केले. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. 

याबाबत कंपनीचे मालक व एच.आर.प्रमोद माने यांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी(दि.11) कंपनीला सुट्टी असल्याने कंपनी बंद होती.  मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रखवालदार दाजी गोरे हा कंपनीच्या आतील दक्षिण बाजूस हातात बॅटरी घेऊन फिरत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने पाठीमागून येऊन गोरेच्या मानेला हात घालून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. 

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेजारील कंपनीतील एका रखवालदाराने जखमी गोरेला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मोबाईल उचलत नसल्यामुळे त्याला शोधण्यासाठी कंपनीच्या आवारात येऊन शोधाशोध केली असता. गोरे कामगारांच्या खोलीत जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.कंपनीचे एच.आर. प्रमोद माने व सिक्युरीटीच्या प्रमुखांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी गोरेला मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

घटनास्थळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलिस फौजफाट्यासह कंपनीला भेट देऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली आहे..