Wed, Nov 21, 2018 01:26



होमपेज › Sangli › सांगली : युवतीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्‍छेदन

सांगली : युवतीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्‍छेदन

Published On: Jan 29 2018 9:04PM | Last Updated: Jan 29 2018 9:04PM



वाळवा : पुढारी ऑनलाईन

वाळवा तालुक्यातील शिगाव येथे शनिवारी १९ वर्षीय युवतीने आत्‍महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेबाबत संशय व्यक्‍त करण्यात आल्याने आज पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्‍छेदन केले. या घटनेमुळे परिसरात युवतीच्या मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, या १९ वर्षीय युवतीने शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्या केली. बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीयांनी मृतदेहाचे दफन केले. मात्र, आत्‍महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यानंतर अज्ञाताने आष्‍टा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी व पंचांनी घटनास्‍थळी भेट दिली. दफन केलेल्या युवतीचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तसेच मृतदेहाचे आष्‍टा येथील ग्रामीण रुग्‍णालयात शवविच्‍छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुन्‍हा दफन केले. या घटनेचे पोलिसांनी व्‍हिडिओ चित्रीकरण केले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.