Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Sangli › सांगली : चांदोली धरण 90 टक्के भरले 

सांगली : चांदोली धरण 90 टक्के भरले

Published On: Aug 05 2018 12:25PM | Last Updated: Aug 05 2018 12:25PMवारणावती : वार्ताहर  

सांगली जिल्‍ह्यातील चांदोली धरण 90 टक्के भरले आहे.  धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे .गेल्या चोवीस तासात 37 मिलिमीटर पाऊस पडला आहे.  धरण पाणलोट  क्षेत्रात  पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 6947  कुसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ती 624.20 मीटरवर पोहोचली  तर धरण 90.85  टक्के भरले आहे.  

दोली धरणाचे दरवाजे बंद असल्यामुळे पाणी पातळी वाढू लागली आहे.  गेल्या चार दिवसांपासून  पावसाने थोडी उसंत घेतली होती. कालपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे . सध्या  धरणात  31.26 टीएमसी पाणी असुन आज अखेर 2098  मिलिमीटर पाऊस येथे पडला आहे. 

चांदोलीचा निसर्ग बहरला

 पाणलोट क्षेत्रात 6947 क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. धरणाची पाणीपातळी सध्या 624.20 मिटर आहे.  सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील निसर्ग बहरला आहे.  उंचावरून कोसळणारे छोटे मोठे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.  परिणामी पर्यटकांची गर्दी  वाढू लागली आहे. या नयनरम्य धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्यामुळे दुरूनच पर्यटकांना समाधान मानावे लागत आहे. दुसरीकडे भात पिकेही जोमात आली आहेत त्यामुळे चांदोलीचा संपूर्ण परिसर हिरवागार दिसू लागला आहे.