Sun, Feb 23, 2020 11:12होमपेज › Sangli › मारहाणीत जखमी शिक्षकाचा मृत्यू

मारहाणीत जखमी शिक्षकाचा मृत्यू

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 06 2018 12:47AM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

शहरातील शास्त्री चौकात दि. 26 डिसेंबररोजी रात्री मारहाणीत जखमी झालेल्या शिक्षकाचा गुरुवारी मृत्यू झाला. सुनील आण्णासाहेब आंबी (वय 42, रा. विश्‍वविजय चौक, गावभाग, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात सात ते आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर आण्णासाहेब आंबी (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. आंबी कुटुंबासमवेत गावभागातील विश्‍वविजय चौकात राहतात. विश्रामबाग येथील एका शाळेत ते शिक्षक म्हणून काम करीत होते. दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना अज्ञातांनी मोबाईलवर फोन करून चर्चा करायची असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले. 

सुनील तेथे आल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना आडबाजूला नेले. तेथे चर्चा न करता लोखंडी रॉड, काठीने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा त्यांना डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. यामध्ये डोक्यात वर्मी घाव बसल्याने ते तेथेच कोसळले. त्यानंतर हल्लेखोर निघून गेले. 
त्यानंतर रात्री उशिरा त्यांना बेशुद्धावस्थेत सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात  आले. 

एका व्यक्तीविरोधात संशय् शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे बंधू सुधीर आंबी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सात ते आठजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी एका व्यक्तीविरोधात संशय व्यक्त केला असून याचा गतीने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले.