Thu, Jul 18, 2019 12:54होमपेज › Sangli › ऐश्‍वर्या कांबळेच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत सुपूर्त

ऐश्‍वर्या कांबळेच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत सुपूर्त

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:51AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत सद्भावना रॅलीनंतर मृत्यू झालेल्या ऐश्‍वर्या कांबळे हिच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार या मदतीचा धनादेश शनिवारी  प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व भाजपचे नेते शेखर इनामदार यांच्याहस्ते प्रियांकाचे वडील शशिकांत कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. गेल्या रविवारी (दि. 14 जानेवारी) ही सद्भावना एकता रॅली उत्साहात पार पडली. ही रॅली संपवून घरी परतताना ऐश्‍वर्या कांबळे ही 14 वर्षांची विद्यार्थिनी चक्कर येऊन कोसळली होती. तिला उपचारांसाठी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.  या दुर्दैवी प्रकाराची गंभीर दखल घेत  आमदार गाडगीळ  यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली. त्यानुसार  फडणवीस यांनी या ऐश्‍वर्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली होती. तसे  गाडगीळ यांनी तत्काळ तसे कुटुंबियांना भेटून आश्‍वासन दिले होते. त्या मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनाकडे आज प्राप्त झाला. तो धनादेश प्रांताधिकारी डॉ. खरात, शेखर इनामदार यांच्यासह सर्व नेते, पदाधिकार्‍यांनी ऐश्‍वर्याच्या कुटुंबियांना घरी जाऊन सुपूर्त केला. यावेळी भाजपचे नेते प्रकाश बिरजे, आरपीआयचे नेते सुरेश दुधगावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित  होते.