Thu, Jul 18, 2019 16:33होमपेज › Sangli › मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार

मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:32AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी प्रारूप प्रभागरचना अनुसूचित जाती आरक्षणासह निश्‍चित केली आहे. ती दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. 17) ते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे सादर करणार आहेत. या दोघांच्या समन्वयाने तपासणीनंतर ती दहा दिवसांत विभागीय आयुक्तांकडे जाईल. त्यानुसार तिघांच्या समितीद्वारे त्यावर शिक्कामोर्तब होऊन दि. 3 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.  जूनच्या शेवटच्या आठवड्यात  महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली  होती. यामध्ये महापालिकेने 2003 च्या त्रिसदस्यीय    

प्रभागरचनेचा प्रामुख्याने आधार घेतल्याचे समजते. यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने 2011 च्या जणगणनानिहाय प्रगणक गटाची नकाशावर नोंद करून घेतली होती. त्यासाठी सांगलीतील एका खासगी संगणक कंपनीला ठेकाही देण्यात आला होता. त्यांनी तशी प्रारूप प्रभागरचना तयारही केली होती. त्या आधारे आयुक्त खेबुडकर यांनी महापालिकेच्या निवडक सात ते आठ अधिकार्‍यांच्या सहाय्याने गेल्या आठवडाभरात निवडणूक प्रभागरचना व अनुसूचित जातीचे आरक्षित प्रभाग यांची निश्‍चिती केली.  मनपाच्या 80 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग तयार केल्याचे वृत्त आहे. एका प्रभागात सुमारे 22 हजारावर मतदार आहेत. तर तीन सदस्यीय प्रभागात 16 हजार 500 च्या दरम्यान मतदार आहेत. पाच सदस्यीय प्रभागात तर ही संख्या 31 हजारांवर गेली आहे.

यातून निवडणूक आयोगच्या निकषानुसार यातूून चार सदस्यांचे 18 तर सांगलीवाडीसाठी तीन सदस्यांचा एक व मिरजेसाठी 5 सदस्यांचा एक प्रभाग असल्याची आणि मागासवर्गीय प्रभाग देखील निश्‍चित केल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोग दि. 13 मार्चला प्रारूप प्रभाग रचना अंतिम करणार आहे. त्यानंतर 20 मार्चला आरक्षण सोडत होणार आहे.