Tue, Apr 23, 2019 01:48होमपेज › Sangli ›

जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प

जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:18AMसांगली : गणेश कांबळे

‘नदीच्या वाळूची, अन् भाजक्या विटांचीच घरे हवीत’, ही लोकांची पारंपरिक मानसिकता आहे. परंतु  वाळू व माती उपसावर बंदी असल्याने यावर कोणताही मार्ग निघणार नाही, हे वास्तव आहे. वाळूअभावी सांगली परिसरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 110 प्रकारच्या विविध व्यवसायांवरही गंभीर परिणाम झाला आहे. सांगलीतील बिल्डर प्रमोद शिंदे म्हणाले, पर्यावरणाचा विचार करून हरित लवादाने नदीतील वाळू उपसा करण्यावर बंदी घातली.

तसेच माती उपसा करण्यावरही बंदी घालण्यात आली. न्यायालयाचा आदेश असल्याने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कडकपणे करण्यात आली. सांगली जिल्ह्यातही वाळू उपसा बंद आहे. त्याबरोबर 2014 पासून सर्वत्र बांधकाम व्यवसायात मंदी आहे. असे असतानाही सिमेंट व सळईचे दर मात्र वाढतच राहिले. याचा परिणाम म्हणून बांधकाम  महाग झाले आहे.  पारंपरिक मानसिकता शिंदे म्हणाले, सांगली भागात अजूनही नदीतून निघालेलीच वाळू हवी ही पारंपरिक मानसिकता टिकून आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार आता ते काही शक्य नाही. समुद्रातील वाळूचे दर भरमसाठ आहेत.  ज्यांना शक्य आहे, त्यांची घरे आम्ही बांधून देतो.

परंतु त्यातही दोन ब्रास वाळूमध्ये अर्धा ब्रास वेस्टेजच निघते. त्यामुळे बांधकाम महाग झालेले आहेत.   सांगली परिसरातील 50 टक्के फ्लॅट विक्रीविना पडून चार वर्षापूर्वी वाळू स्वस्त होती. बिल्डर्संनी लाखो रुपये गुंतवणूक करून फ्लॅट बांधलेले आहेत. परंतु त्यानंतरच्या मंदीमुळे त्यापैकी 50 टक्के फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. मंदीमुळे लोकांजवळ पैसा नाही. शेतकर्‍यांकडे पैसा असेल तर तो बाजारात फिरतो. परंतु शेतकर्‍यांचीच परिस्थिती अवघड झालेली आहे.  

 गुंतवणुकीपेक्षा कुटुंबांची सोय

क्रिडाईचे अध्यक्ष विकास लागू म्हणाले, सांगलीमध्ये लोक गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी करीत नाहीत. पुण्यामध्ये फ्लॅटमध्ये पैशाची गुंतवणूक होती. परंतु आपल्याकडे तसे नाही. राहण्यासाठी म्हणून फ्लॅट खरेदी करीत असतात. त्यामुळे प्रामुख्याने  शाळा, कोचिंग क्‍लास, संरक्षण, बाजार अशा गोष्टींचा विचार केला जातो. परंतु  दर सामान्यांना   परवडत नाहीत. यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे.
 

 

tags : Sangli,news, Sand,soil, ban, imposed,Sangli, district, close, Construction, business,