Tue, Mar 19, 2019 20:31होमपेज › Sangli › घरे झालेल्या भूखंडांवरील आरक्षणे रद्द

घरे झालेल्या भूखंडांवरील आरक्षणे रद्द

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:31AMसांगली : प्रतिनिधी

मंजूर शहर विकास आराखड्यातील रस्ता, ट्रक पार्किग, उद्यानांच्या आरक्षित जागांवर घरे झाली आहेत. ती रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी महासभेत एकमताने घेण्यात आला. मात्र, आरक्षित जागेवरील बांधकामे सोडून उर्वरित रिकाम्या भूखंडांवरील आरक्षणे कायम ठेवणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी जाहीर केले. सांगलीतील सर्व्हे क्र. 302 / अ / 1/ 1/ 1 या जागेवर ट्रक पार्किंगचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी गुंठेवारीअंतर्गत घरे झाली आहेत. त्यामुळे हे आरक्षण उठविण्याचा विषय महासभेसमोर होता. यासह अन्य सहा गुंठेवारीतील आरक्षणे उठविण्यासाठी नगरसेवक, नगरसेविका आक्रमक होते. यावरून महासभेत घमासान रंगले.  

नगरसेवक शेखर माने यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक पेंडसे आरक्षणासंदर्भात खुलासा मागितला. पेंडसे म्हणाले, या भूखंडावर ट्रक पार्किंगचे 109 क्रमांकाचे आरक्षण आहे. त्याखाली 54 भूखंड असून त्यांचे क्षेत्र 13 हजार चौरस मीटर आहे. यावरील 26 भूखंडावर गुंठेवारी  असून, बांधकामे झाली आहेत. उर्वरित भूखंड खुले आहेत. यावर माने म्हणाले, तत्कालीन सांगली पालिकेच्या काळात 1976 पासून ते 2005 साली महापालिकेच्या विकास आराखड्यातही आरक्षण कायम आहे.

गेल्या 2014 मध्ये मंजूर अंतिम विकास आराखड्यातही शासनाने त्याला मान्यता दिली आहे. लोकांच्या घरावर जर आरक्षण असेल तर ते रद्द करण्यास हरकत नाही. मात्र त्या नावे खुल्या जागेवरील आरक्षणाचा बाजार कोणासाठी?  शिकलगार म्हणाले, जेथे घरे झाली आहेत, तीच आरक्षणे कायद्यानुसार उठविण्यात येतील. अन्य भूखंडावरील आरक्षण उठवण्याचा प्रश्नच येत नाही. त्या सर्व मोकळ्या जागांवरील आरक्षणे कायम ठेवून प्रशासनाने जागा महापालिकेच्या ताब्यात घ्याव्यात. यासह आराखड्यातील संजयनगर, कुपवाडसह विविध रस्ते, उद्यानांसह अन्य आरक्षणे उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.