Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Sangli › राजमाता जिजाऊ पोषक आहार अभियान 15 पासून

राजमाता जिजाऊ पोषक आहार अभियान 15 पासून

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 9:02PM

बुकमार्क करा
सांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यात राजमाता जिजाऊ पोेषक आहार अभियान दि. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. शासननिधी आणि लोकसहभागातून हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. कुपोषित, कमी वजनाच्या बालकांना दिवसातून 8 वेळा पोषक आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक गावात अंगणवाडीत बालविकास केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. जिल्ह्यात 172 बालके तीव्र कुपोषित, तर 1 हजार 125 बालके मध्यम कुपोषित आहेत. या व्यतिरिक्त 4 हजार 173 बालके तीव्र कमी वजनाची व कमी वजनाची आहेत. यातील बहुसंख्य बालके ही कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत. आरोग्य व आहार याद्वारे ही बालके सर्वसाधारण श्रेणीत येऊ शकतात. 

प्रा. डॉ. नायकवडी म्हणाल्या, गोरगरीब, वंचित घटकांच्या बालकांना पुरेसा सकस आहार मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांमधील बालकांच्या आहारात ‘जंक फूड’चा वापर मोठा असतो. त्याच्या सेवनामुळे वाढीसाठी पोषणमुल्य अत्यंत कमी मिळतात. राजमाता जिजाऊ पोषक आहार जागृती अभियान महत्वपूर्ण आहे. हे अभियान दि. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. बालकांच्या आहाराविषयी जागृती तसेच शासन निधी, लोकसहभाग, पालक यांच्या माध्यमातून कुपोेषित, कमी वजनाच्या बालकांना दिवसातून किमान 8 वेळा पोषक आहार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न 
आहे