Thu, Jan 24, 2019 14:00होमपेज › Sangli › सांगलीत खुल्या भूखंडावर मनपा करणार जंगल

सांगलीत खुल्या भूखंडावर मनपा करणार जंगल

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 11:59PMसांगली : प्रतिनिधी

येथील वसंतदादा कारखान्यासमोरल शिवाजीनगर हौसिंग सोसायटीत खुल्या भूखंडावर 1700 वक्ष लावून चक्क जंगलच साकारणार असल्याची कबुली उद्यान अधीक्षकांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत दिली. भरवस्तीत एवढ्या जागेवर जंगल करून गैरप्रकाराला सोयच करून देणार का? असा संतप्त सवाल सदस्या रोहिणी पाटील यांच्यासह सदस्यांनी केला. हा कारभार थांबविण्याचे आदेश सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी दिले.

याबाबत पाटील म्हणाल्या, शिवाजी हौसिंग सोसायटीत खुल्या भूखंडावर 5-6 गुंठ्यात शहरी आरोग्य अभियानांतर्गत दवाखाना उभारण्यात आला आहे. त्याजवळच असलेल्या 14-15 गुंठे जागेवर गैरप्रकार होत असतात. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या, यावेळी उद्यान अधीक्षक श्री. कोरे यांनी तेथे 1700 वृक्ष लावणार असल्याचे स्पष्ट केले. एवढ्या जागेत ही झाडे कशी लावणार?   तेथे डासांचे साम्राज्य पसरेल. गैरसोय होईल. त्यामुळे असे करू नये असेही बजावले.  पण यावर कोरे म्हणाले, या जागेवर 5 बाय 5 झाडेच लावण्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसारच ही झाडे तेथे लावण्याचा आराखडा आम्ही राबवत आहोत.  विश्रामबाग परिसरात आरोग्य विभागाने मोकाट फिरून घाणीचे साम्राज्य निर्माण करणारी अनेक गाढव पकडली होती.