होमपेज › Sangli › जि. प. शाळांची बाजी; सांगली-मिरज पिछाडीवर

जि. प. शाळांची बाजी; सांगली-मिरज पिछाडीवर

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 8:47PMसांगली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील 34 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. सांगली, मिरजेतील शाळा पिछाडीवर राहिल्या आहेत. राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या 34 विद्यार्थ्यांपैकी केवळ 2 विद्यार्थीं सांगली शहरातील आहे.

पाचवी ग्रामीण विभाग- राज्य यादीत चौथी- आरती चंद्रकांत पाटील (जि. प. शाळा बोरगाव, ता. कवठेमहांकाळ)- 93.29 टक्के. राज्यात यादीत सहावा- आर्यन सुनील मगदूम (जि. प. शाळा आरग नं. 1)-91.28 टक्के, राज्यात सातवा क्रमांक- स्नेहा आनंदराव झांबरे (जि. प. शाळा बागमळा डोंगरसोनी, ता. तासगाव)- 90.60 टक्के, तेजस कुमार माळी (जि. प. शाळा नं. 1 कवठेएकंद)- 90.60 टक्के, आरती बाळकृष्ण कदम (जि. प. शाळा बोरगाव, ता. कवठेमहांकाळ)- 90.60 टक्के, सुहानी समाधान शिम्पणेकर (जि. प. शाळा नं. 2 बागणी, ता. वाळवा)- 90.60 टक्के, राज्यात आठवी- आदिती बाळासाहेब माने (प्रकाश प्रायमरी स्कूल, ता. वाळवा)- 89.93 टक्के, राज्यात नववा- आदित्य विक्रम फराटे (जि. प. शाळा अंतराळ, ता. जत)- 89.26 टक्के, राज्यात दहावा- राज रमेश शेंडगे (जि. प. शाळा हातनूर, ता. तासगाव)-88.59 टक्के, गुरूनाथ शंकर पाटील (झरे पंचक्रोशी जनता विद्यालय, ता. आटपाडी)- 88.59 टक्के, हर्षद सर्जेराव देसाई- (हुतात्मा भगतसिंह हायस्कूल, ता. पलूस)- 88.59 टक्के, सुमितराज चंद्रकांत यादव (गांधी सेवाधाम विद्यालय आरळा, ता. शिराळा)- 88.59 टक्के.

पाचवी शहरी विभाग : राज्य यादीत आठवा क्रमांक- सानिका सुहास पाटील (एस. आर. भारती विद्यामंदिर, तासगाव)- 90.60 टक्के, ऋग्वेद रत्नाकर मुळीक (अभिनव, सांगली)-90.60 टक्के, अथर्व सुनील खोत (इस्लामपूर हायस्कूल)- 90.60 टक्के, राज्यात 15 वा- अमेय उदयसिंह माने (इस्लामपूर हायस्कूल)- 87.92 टक्के, राज्यात 17 वा  - अपूर्वा नंदकुमार खराडे ( भारती विद्यामंदिर, तासगाव)- 87.25 टक्के, अथर्व प्रकाश पाटील (इस्लामपूर हायस्कूल)- 87.25 टक्के. 

पाचवी सीबीएसई/आयसीएसई विभाग : राज्य यादीत चौथा - उत्कर्षा चंद्रशेखर हळींगळे ( बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली)- 86.39 टक्के, राज्यात 13 वा- आयन जाविद शिकलगार (प्रकाश पब्लिक स्कूल ऊरूण इस्लामपूर)- 80.95 टक्के, राज्यात 15 वा  - सिद्धी शांताराम सपकाळ (सह्याद्री  स्कूल रेड, ता. शिराळा)- 79.86 टक्के. 

आठवी शहरी विभाग : राज्य गुणवत्ता यादीत 5 वा क्रमांक : पूर्वा विष्णू पाटील (आदर्श बालकमंदिर इस्लामपूर)- 94.59 टक्के, राज्यात 7 वा - अदिती झुंझारराव पाटील (इस्लामपूर हायस्कूल)- 93.92 टक्के, राज्यात 19 वा- ओंकार सतीश पवार ( भारती विद्यामंदिर, तासगाव)- 88.51 टक्के.  आठवी ग्रामीण विभाग : राज्य यादीत 4 था - कौस्तुभ सुरेश पाटील (जि. प. शाळा रायवाडी )- 92.57 टक्के, राज्यात  7 वा - स्वराली सोमनाथ लकडे (जि. प. शाळा बोरगाव (तासगाव)- 90.54 टक्के, राज्यात 10 वा - तेजस्विनी शहाजी पाटील (आनंद गुरूकुल चिकुर्डे) - 89.19 टक्के, राज्यात 12 वा- स्वरुप रामचंद्र सावंत ( माने-पाटील विद्यामंदिर,विसापूर, ता.  तासगाव) - 87.84 टक्के, राज्यात 16 वा- श्रेयस सिदगौंडा पाटील (म. गांधी विद्यालय सावळज)- 86.49 टक्के, प्राजक्‍ता नामदेव बाड (एम. जी. विद्यालय कडेगाव)- 86.49 टक्के, राज्यात 19 वा- आदिनाथ राजाराम पाटील (नचिकेत, शिराळा)- 85.14 टक्के, साहिल गजानन पाटील (नेहरू विद्यालय कवलापूर)- 85.14 टक्के, राज्यात  20 वा - तेजस्विनी संदीप भिलवडे (समडोळी हायस्कूल)- 84.46 टक्के.

पाचवीच्या शिष्यवृत्तीत  ग्रामीणचे मेरीट जादा

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत  जिल्हा परिषद शाळा बोरगाव (ता. कवठेमहांकाळ)ची विद्यार्थिनी आरती चंद्रकांत पाटील (93.29 टक्के) हिने ग्रामीण विभाग राज्य गुणवत्ता यादीत चौथा व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. शहरी विभाग जिल्ह्यात प्रथम व राज्य यादीत आठवा क्रमांक मिळालेल्या सानिका सुहास पाटील (तासगाव) हिला 90.60 टक्के गुण मिळाले. 

आठवीच्या शिष्यवृत्तीत शहरीचे मेरीट जादा

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागातून राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक व जिल्ह्यात प्रथम आलेल्या  पूर्वा विष्णू पाटील (इस्लामपूर)हिला 94.59 टक्के गुण मिळाले. ग्रामीण विभागातून राज्य यादीत चौथा व जिल्ह्यात प्रथम आलेल्या कौस्तुभ  सुरेश पाटील (जि. प. शाळा रायवाडी) याला 92.57 टक्के गुण मिळाले.सीबीएसईच्या राज्य यादीत जिल्ह्यातील  3 विद्यार्थीपाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएसई/आयसीएसई शाळांमधून उत्कर्षा चंद्रशेखर हळींगळे (बिरनाळे स्कूल) 86.39 टक्के गुण मिळवत राज्य यादीत चौथी, आयन जाविद शिकलगार- 80.95 टक्के (प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर) तेरावा, सिद्धी शांताराम सपकाळ- 79.86  टक्के (रेड) राज्य यादीत 15 वा आला आहे.