Sun, Sep 23, 2018 23:53होमपेज › Sangli › न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा

न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करा

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 21 2018 12:31AMसांगली  :वार्ताहर

वकील व पक्षकारांनी न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करावा, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. बिष्ट यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी  केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पंधरा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी न्यायाधीश बिष्ट म्हणाले, न्यायालयीन कामकाज इंग्रजीतच चालावे असा काही कायदा नाही. पक्षकार व वकिलांनी  मराठी भाषेचा वापर करण्यास हरकत  नाही. डॉ. प्रा. वि. दा. वासमकर, प्रा. एम. ए. कोरे, जिल्हा न्यायाधीश डी. एस. गोखले, जिल्हा न्यायाधीश सौ. एस. एस. सापटनेकर, जिल्हा न्यायाधीश जी. ए. रामटेके यांची यावेळी भाषणे झाली.

जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई, जिल्हा न्यायाधीश व्ही. बी. काकतकर, वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र, जिल्हा न्यायालय प्रबंधक सौ. व्ही. व्ही. कुलकर्णी, हिंगमिरे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, विधी प्राधिकरणाचे अधीक्षक डी. एस. खंडागळे, एस. आर, भालकर, नितीन आंबेकर आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राधीकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. जी. भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. सत्यजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. न्यायाधीश व्ही. आर. पाटील यांनी आभार  मानले.