Thu, Nov 15, 2018 15:51होमपेज › Sangli › सांगली : जत तालुक्यात दूध आंदोलनाची  वाढली तीव्रता 

सांगली : जत तालुक्यात दूध आंदोलनाची  वाढली तीव्रता 

Published On: Jul 17 2018 12:57PM | Last Updated: Jul 17 2018 12:57PM
येळवी :  वार्ताहर 

जत तालुक्यात दूध आंदोलनाची तीव्रता वाढली असून दूध उत्पादक शेतकरी  रस्त्यावर  उतरलेले आहेत.  सोरडी,  सनमडी, येळवी,  बनाळी,  डफळापूर ,  शेगावसह अनेक गावात दूध उत्पादकांनी संकलन  केंद्राकडे  पाठ  फिरवली  आहे. यामूळे पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख लीटर दूधाचे संकलन झाले नाही.

 मुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या  फोटोला दूधाचा अभिषेक 

 दुसर्‍या  दिवशी या आंदोलनाची सकाळपासून तीव्रता वाढली आसून  येळवी( ता.जत) येथे दुधाच्या दरात वाढ करावी.  या मागणीसाठी शासनाचा येळवी  जत रस्त्यावर दूध धोरणाविषयी नाराजी व्यक्त करत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालत  मुख्यमंत्र्याना दूध दरवाढकरिता सुबुध्दी द्यावी, अशी  दूध उत्पादकानी विनंती  केली.  तसेच मुख्‍य चौकत दोनशे लीटर दूध ओतून  शासनाचा निषेध  व्यक्त  केला.  उर्वरित दूध  शालेय विद्यार्थांना वाटप केले.

 यावेळी नवज्योत दूध संकलन केंद्राचे  लिंबाजी सोलनकर, दिपक अंकलगी,  संतोष स्वामी,  दिपक चव्हाण,  राजू कदम,  नवनाथ पवार,  माऊली दूध संकलनाचे प्रविण जगदाळे,  अंकुश  गोरड यांच्यासह  दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.