Wed, Nov 14, 2018 00:33



होमपेज › Sangli › मसाल्याच्या फोडणीला भेसळीचा ‘ठसका’

मसाल्याच्या फोडणीला भेसळीचा ‘ठसका’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सांगली  : सुनील कदम

अस्सल पश्‍चिम महाराष्ट्राच्या जेवणाची खासियत कशात असेल, तर ती वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये. या मसाल्याच्या पदार्थांमुळे या जेवणाची लज्जत पार सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत या मसालेदार जेवणाच्या फोडणीला भेसळीचा ‘ठसका’ लागताना दिसत आहे. त्यामुळे अस्सल घाटी जेवणाची जिभेवर रेंगाळणारी चव आता बेचव होताना दिसत आहे.
तमालपत्र, बडीशेप, चक्रफूल, मिरे, ओवा, काळाजिरा, दालचिनी, धने, जिरे, कडीपत्ता, लवंग, वेलदोडा, मेथी, मोहरी, तीळ, चिंच, केशर, खसखस, हळद हे मसाल्याचे पदार्थ म्हणजे या जेवणाचे सार आहे. मात्र, अलीकडील काही वर्षांत या मसाल्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येऊ लागली आहे. 

तमालपत्र म्हणून कोणत्यातरी जंगली झाडाची पाने गळ्यात मारली जात आहेत. चक्रफुलाच्या नावाखाली भलतेच काहीतरी ग्राहकांच्या माथी मारून त्याला उल्लू बनविण्याचा उद्योग चालतो. तेल आणि अर्क काढून घेतलेल्या लवंगा, वेलदोडे आणि मिरे ग्राहकांच्या डोक्यावर वाटण्याचा उद्योग  खुलेआमपणे सुरू आहे. भेसळीचा ओवा ग्राहकांची पोटदुखी वाढवतो  आहे. काळाजिरा म्हणून कसल्याही  डाच्या बिया गळ्यात मारल्या जात आहेत. दालचिनी म्हणून भलत्याच झाडाची साल ग्राहकाला चिकटवली जात आहे. धने किंवा धने पावडरीतील लाकडाच्या भुशाची भेसळ तर ‘धन्य-धन्य’ म्हणावी अशा स्वरूपाची  आहे.

धोतरा ही एक विषारी वनस्पती आहे.  या धोतर्‍याच्या बोंडाच्या आतमध्ये ज्या काळ्या बिया असतात, त्या दिसायला हुबेहुब मोहरीसारख्या दिसतात; पण विषारी असतात. त्या बिया खाण्यात आल्या, तर माणसाचीच काय; पण जनावराचीसुद्धा बुद्धी भ्रष्ट होण्याचा धोका असतो. मात्र, भेसळीच्या धंद्यातील बक्कळ पैशांमुळे मती भ्रष्ट झालेली मंडळी या धोतर्‍याच्या बिया मोहरीत मिसळताना  तात. तिळामध्ये कुर्डू म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनस्पतीच्या शिजवलेल्या बिया मिसळल्या जात आहेत. केशर म्हणून मक्याच्या कणसावर तरंगणारे तुरे ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत.  सखशीमध्ये गव्हाचा रवा आणि हळदीत चक्क खडूची पावडर किंवा पिवळ्या रंगाचा वापर केला जात आहे. मसाल्याच्या पदार्थांमधील या असल्या भेसळीमुळे जेवणाची लज्जत हळूहळू बेचव होताना दिसत आहे.