Tue, Feb 19, 2019 20:22होमपेज › Sangli › सांगली : विट्‍यात बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद  (Video)

सांगली : विट्‍यात बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद  (Video)

Published On: Aug 09 2018 11:46AM | Last Updated: Aug 09 2018 11:46AMविटा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज (९ ऑगस्‍ट) रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी बंदला सकाळपासूनच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आहे. राज्यभरात बहुतेक ठिकाणी बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी देण्यात आली आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर सकाळी हजारो तरुणांनी विटा शहरातून मोटार सायकलने रॅली काढून विटा बंद केले. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

यास प्रतिसाद देत विटेकर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन मराठा समाजाला पाठिंबा दर्शविला. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणत्याग करणाऱ्या काकासाहेब शिंदे- पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. 

विट्‍यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. नगरसेवक अमोल बाबर,  शंकर मोहिते , शौर्या पवार ,  यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांना शहर बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. यांत महिला वर्गाचा ही समावेश आहे .