Wed, Apr 24, 2019 08:06होमपेज › Sangli › सांगली : सह्याद्री, हुबळी एक्स्प्रेसवर दरोड्‍याचा प्रयत्‍न

सांगली : सह्याद्री, हुबळी एक्स्प्रेसवर दरोड्‍याचा प्रयत्‍न

Published On: Aug 19 2018 1:32PM | Last Updated: Aug 19 2018 1:32PMमिरज : प्रतिनिधी 

मिरज - पुणे रेल्वे मार्गावर साल्पा आणि आदरकी स्थानका जवळ सिग्नलमध्ये बिघाड निर्माण करून दोन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

कोल्हापूर - मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस मध्यरात्री साल्पा स्थानकातून सुटल्यानंतर सिग्नल मध्ये बिघाड झाल्याने थांबली. यावेळी खिडकीतून हात घालून प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी तोडले मात्र ते रेल्वेतच पडले.

लोकमान्य टिळक टर्मिनस ( LTT मुंबई) - हुबळी एक्स्प्रेसही आदरकी स्थानका जवळ सिग्नलमध्ये बिघाड करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या दोन्ही गाड्यातील किती प्रवाशांना लुटले व किती ऐवज चोरीस गेला हे मात्र समजू शकले नाही.  

कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या सह्याद्री एक्स्प्रेसला आरपीएफ चा बंदोबस्त होता. गाडी स्थानकातून निघाल्यानंतर गाडी सिग्नल जवळ थांबल्याचे निदर्शनास येताच आरपीएफ जवानांनी मिरज आरपीएफला संदेश पाठवून गाडीवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे कळवले. परंतु हुबळी एक्स्प्रेसला बंदोबस्त नसल्याने गाडी नेमकी किती वेळ थांबली व किती ऐवज चोरीस गेला हे  समजू शकले नाही. मात्र याबाबत काही प्रवाशांनी सातारा आरपीएफकडे  तक्रारी दाखल केल्या आहेत.