Wed, Apr 24, 2019 12:04होमपेज › Sangli › पत्नीने घातली पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप

पत्नीने घातली पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:15AMसांगली  : प्रतिनिधी

शहरातील वारणालीतील विद्यानगर येथे घरगुती वाद विकोपाला गेल्यानंतर चक्क पत्नीनेच पतीच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये पती गंभीर जखमी झाला असून पत्नीविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 
सुशीला बसाप्पा पाटील (वय 38) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी बसाप्पा भिमराव पाटील (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी पाटील पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सुशीला यांनी रागाच्या भरात बसाप्पा यांच्या डोक्यात लोखंडी पाईप घातली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसाप्पा यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशीला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.