Tue, Jan 22, 2019 09:39होमपेज › Sangli › सांगली : चांदोली धरणातून विसर्ग वाढला 

सांगली : चांदोली धरणातून विसर्ग वाढला 

Published On: Aug 17 2018 12:56PM | Last Updated: Aug 17 2018 12:48PMवारणावती: वार्ताहर

चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात ३२ मिलीमीटर पावसासह आज अखेर २३८२ मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणात ३३.३४ टीएमसी पाणीसाठा झाला असुन धरण ९६.९० टक्के भरले आहे. 

संततधार पावसामुळे  जलाशयात येत असलेली पाण्याची आवक पाहून धरणाच्या सांडव्याद्वारे सध्या सुरु असणारा पाण्याचा विसर्ग आज दुपारी बाराच्या दरम्यान वाढवण्यात आला आहे. धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या धरणातून ९५०० क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा वारणा नदीची पाणी पातळी वाढून नदी पात्राबाहेर गेली आहे. 

 वारणा काठची शेती आता पाण्याखाली गेली आहे. पावसाची संततधार अशीच कायम राहिल्यास हा विसर्ग पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन वारणा पाटबंधारे शाखा वारणावतीचे शाखाधिकारी प्रदीप कदम यांनी केले आहे.