Thu, Apr 25, 2019 04:07होमपेज › Sangli ›   खैराव येथे विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू 

 सांगली :  पाण्‍याच्‍या शोधार्थ काळविटाचा मृत्‍यू 

Published On: Jul 24 2018 2:26PM | Last Updated: Jul 24 2018 2:26PMसांगली : प्रतिनिधी

खैराव (ता.जत)येथे  पाण्याचे  तुटवडा असल्याने पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या काळविटाचा  सिध्देश्वर खिलारे यांच्या ५०फूट खोल विहिरीत पडून मृत्यू झाला. या विहिरीस संरक्षक कठडे देखील होते. ही काळविट  मादी असल्याचे दिसून आले. वनविभागाने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. 

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवून लोकांचे हाल सुरु असल्याचे चित्र असताना ,जत,आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या दुष्काळी  तालूक्यात   अद्याप  पुरेशा पाऊस झाल नाही. यामुळे पशूजन्य जीवन धोक्यात आले आहे. हे काळविट खैराव सीमेलगत असणार्‍या मंगळवेढा किंवा सांगोला तालुक्यातून असल्याचा अंदाज वनक्षेत्रपाल हारिबा मोहिते यांनी  सांगितले.

मृत्यू झालेल्या काळविंटाचा पंचनामा वनविभागाने  केला. यावेळी वनक्षेत्रपाल हरिबा मोहिते, सरपंच राजाराम घूटूकडे,  सुनिल जिपटे,  सचिन वगरे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी , ग्रामस्थ  उपस्थित होते. 

वन्यप्राण्यांना पाण्याची व्यवस्था करण्‍याची गरज

 पाण्याअभावी  दुर्मिळ जंगली जीवांचे मात्र अतोनात हाल सुरु आहेत.  पोटात भडकलेली भूक आणि तहान शमविण्याकरिता अन्नपाण्याच्या शोधार्थ वणवण भटकंती करणाऱ्या निष्पाप जंगली जीवांचा असा करुन अंत मनाला चटका लावणारा ठरला आहे.  अशा दुर्मिळ जीवांचे जतन करण्याकरिता पाणी व्यवस्था  शासनाने करणे  गरजेचे आहे .दोन महिन्यांपूर्वी काराजनगी (ता.जत) येथे ही शेततळ्यात नाग जोडी अडकली होती.  परंतु  वनविभागास या नागजोडीस वाचविण्यात यश आले होते. या करिता पशुप्रेमीनी देखील पुढाकार घ्यावा, अशी मागणी  जनतेतून होत आहे.