Wed, Sep 19, 2018 19:09होमपेज › Sangli ›

मासे न केल्याने पत्नीच्या डोक्यात घातला बत्ता

मासे न केल्याने पत्नीच्या डोक्यात घातला बत्ता

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 1:42AMसांगली ; प्रतिनिधी

माशाचे कालवण न बनविल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात  बत्ता घालून जखमी केले. सासूनेही मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह सासूविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात हा प्रकार घडला. इब्राहिम जहांगीर सनदी, सासू चांदणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रूक्सार इब्राहिम सनदी यांनी फिर्याद दिली आहे. 

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास इब्राहिम घरी आला. त्यानंतर त्याने पत्नीला माशाचे कालवण कर, असे सांगितले. मात्र पत्नीने ‘स्वयंपाक तयार आहे  उद्या करते’, असे सांगितले. त्यावर चिडलेल्या इब्राहिमने खलबत्यातील बत्ता घेऊन पत्नीच्या डोक्यात, कपाळावर, नाकावर, कानावर मारला. सासूनेही तिला मारहाण केली.  तिला घरातून हाकलून दिले. मारहाणीत रूक्सार जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात  आले. 
 

 

 

tags ; Sangli,news,Crime, Case, Man, Killed, His, Wife, In Sangli,