Sat, Jul 04, 2020 15:39होमपेज › Sangli › सांगली : पलूसमध्ये आणखी एका वृद्धेला कोरोना

सांगली : पलूसमध्ये आणखी एका वृद्धेला कोरोना

Last Updated: Jun 06 2020 7:08PM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी वृत्तसेवा

पलूस येथील ८८ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बोरिवली (मुंबई) येथून ही महिला तेरा दिवसांपूर्वी पलूस येथे आली आहे. दरम्यान, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तेरा दिवसांनंतर या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली आहे. 

या महिलेमध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. याचबरोबर परेल (मुंबई) येथून पलूस येथे दि. १ जून रोजी आलेल्या 55 वर्षीय पुरूषाचा चाचणी अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आलेला आहे.