Thu, Apr 25, 2019 08:07होमपेज › Sangli › कचर्‍यातून घरातच खत निर्मितीद्वारे बाग फुलवा

कचर्‍यातून घरातच खत निर्मितीद्वारे बाग फुलवा

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 21 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

घराप्रमाणे शहरही स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. त्यानुसार घरातला कचरा रस्त्यावर न टाकता त्याचे खत करा. परसबागा, बागा फुलवून स्वच्छ भारत अभियानाचे शिलेदार बना, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. येथील संजयनगरमध्ये दुधाळ प्राथमिक शाळेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत माहितीपत्रकाचे प्रकाशन आणि ओला-सुका कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गाडगीळ म्हणाले, कचर्‍याची भविष्यात जागतिक समस्या बनणार आहे. त्यामुळे कचर्‍याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांनीही मदत केली पाहिजे. मी स्वत: कचरा करणार नाही व करू देणार नाही, अशी भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे. 

नगरसेवक संतोष पाटील म्हणाले, ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कचर्‍यापासून कंपोस्ट खत करा. त्यातून शेतीला खतही मिळेल, कचर्‍याचा प्रश्‍नही सुटेल. नागरीक हक्क संघटनेचे वि. द. बर्वे यांनी या उपक्रमाबद्दल पुढाकार घेतला, शहरात 60 हजाराहून अधिक पत्रके वाटून जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्थायी सभापती बसवेशवर सातपुते, नगरसेवक मनगू सरगर, भारत दुधाळ, वंदना दुधाळ, हरिभाऊ कुलकर्णी, आनंद सावंत , रामभाऊ मोहिते, रमेश शिंगाडे, दीपक माने, सुनील सरगर उपस्थित होते.