होमपेज › Sangli › सांगली :  पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा : बोराटे (video)

सांगली :  पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा : बोराटे (video)

Published On: Sep 12 2018 3:35PM | Last Updated: Sep 12 2018 3:35PMविटा : प्रतिनिधी 

गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा राखा तसेच  डॉल्बी आणि गुलाल मुक्त, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा , असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी केले.  येथील जय मल्टिपर्पज कार्यालयात गणेशोत्सव आणि मोहरम उत्सवाच्या पार्शवभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोराटे बोलत होते. प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक अमोल बाबर, मुख्याधिकारी महेश रोकडे, देवदत्त राजोपाध्ये उपस्थित होते.  

गणेश मंडळांना सी. सी. टीव्ही बसवण्याचे आवाहन 

अप्पर पोलिस अधीक्षक बोराटे म्हणाले, पारंपरिक वाद्ये एकीकडे दुर्मिळ होत चालली आहेत. त्याचवेळी डॉल्बीसारखी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या यंत्रणा कार्यरत आहेत. त्याचा त्रास आपल्याच परिसरातील लोकांना होत असतो. वास्तविक पाहता सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्या मागे सामाजिक सलोखा राहावा , प्रबोधन व्हावे ही भावना होती. परंतु डॉल्बी मिरवणूक ,  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या मुर्ती , टॉवर वापरले जाणारे रासायनिक रंग यामुळे आपण मूळ उद्देशा पासून दूर जात आहोत. एका गावात एकच गणेशोत्सव असावा त्यातून सगळ्या गावाने एकत्र यावे आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी हा मूळ उद्देश आहे.  गेल्या तीन चार वर्षांपासून आपण जलसंधारणासारख्या कामना निधी गोळा केला  याची दाखल मुख्‍यमंत्र्यांनी घेतली. यावर्षी  सर्व गणेश मंडळांना सी. सी. टीव्ही बसवण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक मंडळाने किमान दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. 

केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे मंडळाना आव्‍हान 

माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले, गणेशोत्सव काळात आरोग्य , रस्ते ,सुविधा देणे बाबत कार्यवाही केली जाईल. शहरासह तालुक्यात सामाजिक सलोखा नेहमीच राखला जातो. केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन  केले.  

प्रशासनाने परवान्‍याच्‍या  बाबतीत सहकार्य करावे

नगरसेवक अमोल बाबर म्हणाले , खानापूर तालुक्यात नेहमीच सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा केला जातो. खेडेगावातून जी छोटी- छोटी मंडळे गणपती बसवीत आहेत त्यांना प्रशासनाने परवाने, विविध परवानग्या बाबतीत सहकार्य करावे.