Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Sangli › मरळनाथपूरमधील घोटाळ्याचे पुरावे सादर

मरळनाथपूरमधील घोटाळ्याचे पुरावे सादर

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 20 2018 1:50AMसांगली : प्रतिनिधी

 मरळनाथपूर (ता. वाळवा) या गावात  कृषी विभागाच्या अनुदानात झालेल्या घोटाळ्याचे सुमारे तीनशे पानांचे पुरावे सोमवारी कृषी अधीक्षक कार्यालयात सादर करण्यात आले. ही माहिती कार्यकर्त्यांनी दिली. पुरावे सादर करण्यासाठी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते.  मरळनाथपूर येथे दिवंगत व्यक्तींच्या नावे कृषी साहित्य वाटप,  वीज कनेक्शन नसलेल्या 28 जणांना कृषी पंप आणि जमीन नसताना कृषी योजनांच्या अनुदानाचा लाभ देऊन  लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार   भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत करण्यात आली होती .  

बळीराजा संघटनेचे  बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे  सुयोग औंधकर यांनी पुरावेही  सादर केल्याचा दावा केला होता. त्यावर जिल्हाधिकारी काळम - पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश  कृषी अधीक्षक  साबळे यांना दिले  होते. त्यानुसार हे पुरावे आज सादर केले, अशी माहिती दिली.  28 शेतकर्‍यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या  शेतकर्‍यांकडे वीज कनेक्शन आहे का, याचा दाखला जोडलेला नाही.  

 कनेक्शन नसताना हे पंप दिले गेले आहेत, त्या बाबत एकच तक्रार अर्ज देण्यात आला आहे.  रामचंद्र दादू खोत या दिवंगत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती 30 ऑगस्ट 1990 ला दिवंगत  झाली आहे.   त्यांच्या नावे 2015-16 ला अनुदान देण्यात आले आहे. संदीप शामराव खोत यांच्या नावे जमीनच नाही, तरी त्यांना 1 लाख 33 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  सुनील मारुती  खोत यांना  3 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशा नऊ प्रकरणांचे पुरावे सादर करण्यात आले. 

 

tags ;  Sangli,news,Agriculture, department,grants, Scam, in Maralanathpur