Fri, Nov 16, 2018 09:13



होमपेज › Sangli › हरिपुरात एकाला बॅटने मारहाण, दोघांवर गुन्हा

हरिपुरात एकाला बॅटने मारहाण, दोघांवर गुन्हा

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 10:36PM



सांगली : प्रतिनिधी

हरिपूर (ता. मिरज) येथे येण्या-जाण्याच्या वादातून एकाला बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेहबूब लोणी, शांताबाई मेहबूब लोणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दशरथ हरिश्‍चंद्र कदम (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. कदम आणि लोणी कुटुंबीय शेजारी-शेजारी राहतात. कदम यांची पत्नी आणि शांताबाई यांचा येण्याजाण्यावरून पूर्वी वाद झाला होता. शनिवारी रात्रीही त्यांचा त्याच कारणावरून वाद झाला. त्यावेळी भांडण सोडविण्यासाठी कदम गेले होते. त्यावेळी लोणी दाम्पत्याने त्यांना बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी लोणी दाम्पत्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.