Mon, May 20, 2019 18:30होमपेज › Sangli › कलर्स मराठीच्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी

कलर्स मराठीच्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:35PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व कलर्स मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  हा कार्यक्रम 27 जानेवारीरोजी सायंकाळी 5 वाजता श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल, नेमिनाथनगर सांगली येथे होणार आहे. 

कार्यक्रमाला कलर्स मराठी फेम व आपल्या सर्वांची आवडती ‘राधा प्रेम रंगी रंगली‘ मधील राधा म्हणजे वीणा जगताप खास कस्तुरींना भेट देण्यासाठी व कस्तुरी सभासदांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे.   या निमित्ताने कस्तुरी सभासद व नवीन सभासद होवू इच्छिणार्‍यांना राधाला भेटण्याची व सोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. विवाहित मंडळी आपल्या जोडीदारासोबत आल्यास काही विशेष खेळांच्यामध्ये भाग घेता येणार आहे. यावेळी कस्तुरी सभासद नोंदणी सुरू राहणार आहे.कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणी फी 500 रुपये आहे. सभासद झाल्यानंतर लगेचच नॉनस्टीक कढई विथ लिड हे हमखास गिफ्ट मिळणार आहे. सभासद महिलांना वर्षभर तसेच विविध दुकानांमधून डिस्काऊंट आणि लकी ड्रॉ गिफ्टस मिळणार आहेत.  याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.