Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Sangli › सांगली-मिरज रस्त्यातील विजेचे धोकायदाक खांब काढण्यास सुरुवात

सांगली-मिरज रस्त्यातील विजेचे धोकायदाक खांब काढण्यास सुरुवात

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:07PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली- मिरज रस्त्यावरील विजेच्या धोकादायक खांबासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणला जाग आली. रस्त्यातील धोकादायक खांब काढण्यास सुरुवात झाली. 

सांगली- मिरज रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी तसेच आहेत. हे खांब तातडीने काढा, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देऊनही महावितरणचे त्याकडे दुर्लक्ष केले होते. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती.  त्यामुळे अपघात होण्याचा धोका होता.   

विजेसाठी पर्यायी लाईन टाकण्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ही लाईन अद्याप सुरू झालेली नव्हती. जुने विजेचे खांब मध्यभागी तसेच होते. रात्रीच्या वेळी हे खांब प्रवाशांच्या लक्षात येत नव्हते.  या खांबावर वाहन आदळून अपघात होण्याचा धोका होता.  त्यामुळे हे खांब तातडीने काढण्यात यावेत, अशी नागरिकांतून मागणी होत होती.