‘मिरज सिव्हिल’चे कोरोना रुग्णालयात रूपांतर

Last Updated: Mar 29 2020 10:41PM
Responsive image


सांगली: पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आतापर्यंत 24 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण  मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

इस्लामपूर येथे अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील  जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत डॉ. विनायक सावर्डेकर, डॉ. प्रशांत होवाळ यांचा समावेश आहे. 

डॉ.  सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देेऊन तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या कोरोना रुग्णालयात रूपांतर केलेे. या रुग्णालयात पंधरा आयसीयू बेड, सिटी स्कॅन, एमआरआय या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या तीन ते चार दिवसांत तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या या संपूर्ण परिसरातील कोरोना संशयितांचे नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवावे लागतात. त्यांचा अहवाल यायला वेळ लागतो. त्यामुळे तोपर्यंत संशयित रुग्णांना विनाकारण अ‍ॅडमिट करून ठेवावे लागते.

टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य मिरजेत दाखल झाले आहे. ही लॅब सुरू झाल्यानंतर सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या सॅम्पल्सची कमी वेळात तपासणी करण्यात येणार आहे.  तपासणीनंतर उपचार  सुरू होऊ शकतील. 

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व रेसिडेंट डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम रविवारपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल येईल असेही देशमुख यांनी सांगितले आहे.articleId: "185535", img: "Article image URL", tags: "Sangali, 'Mirage Civil', transforms, Corona Hospital",