Thu, Jan 24, 2019 05:58होमपेज › Sangli › सांगलीत उद्यापासून संयम स्वर्णदीक्षा महोत्सव

सांगलीत उद्यापासून संयम स्वर्णदीक्षा महोत्सव

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 8:15PMसांगली : प्रतिनिधी

नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम मैदानावर संयम स्वर्ण दीक्षा महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. 15) पासून तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवात नैसर्गिक आरोग्यवर्धक शेतीविषयक परिसंवाद, आरोग्य शिबिर, सद्भावना रॅली आदी कार्यक्रम होणार आहेत. महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष, माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.   समितीचे तात्या नेजकर, राजकुमार चौगुले, अभयकुमार बरगाले,  अ‍ॅड. आप्पासाहेब पाटील, डॉ. शांतीनाथ चौगुले आदी उपस्थित होते. 

सुरेश पाटील म्हणाले, आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांचे  ज्येष्ठ शिष्य श्री 108 महामुनिराज यांच्या सानिध्यात हा महोत्सव होणार आहे.  रविवारी सकाळी 11  वाजता नैसर्गिक शेतीविषयक परिसंवाद होणार आहे.  सोमवारी सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिर होत आहे.  मंगळवारी सकाळी दहा वाजता संयम स्वर्ण सद्भावना रॅली निघणार आहे. यात  51 घोडे, 11 रथ, विविध वाद्ये असणार आहेत. दिगंबर जैन बोर्डिंगपासून रॅली सुरू होणार असून पटेल चौक- राजवाडा चौक- राममंदिर - मार्केट यार्ड- गेस्ट हाऊस - नेमिनाथनगर, असा रॅलीचा मार्ग  आहे. या महोत्सवाचे आयोजन सकल जैन समाज, शांति- विद्या ज्ञानवर्धन समिती, वीर सेवा दल यांनी केले आहे.

मंगळवारी महाआरतीचा विश्‍वविक्रम

सुरेश पाटील म्हणाले, मंगळवारी रात्री साडेआठ वाजता ठिक-ठिकाणी आचार्यश्रींची महाआरती करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात एकाचवेळी महाआरतीचे आयोजन करून एक अनोखा विश्‍वविक्रम करण्यात येणार आहे.