Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Sangli › समृद्धी इंडस्ट्रीजच्या गोदामाला  आग; तीस लाखांचे नुकसान 

समृद्धी इंडस्ट्रीजच्या गोदामाला  आग; तीस लाखांचे नुकसान 

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:18PMकुपवाड : वार्ताहर 

कुपवाड एमआयडीसीतील समृद्धी इंडस्ट्रीज या कंपनीतील गोदामाला शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत कंपनीचे सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची कुपवाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : समृद्धी इंडस्ट्रीजच्या कंपनीतील गोदामाला शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. कर्मचार्‍यांनी तातडीने कुपवाड एमआयडीसीचा अग्‍निशमक विभाग व मालक मालू बंधूना माहिती दिली. 

अग्‍निशमक विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तीन तासानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोल्ड, तयार माल, जाहिरात साहित्य अशा प्लास्टिकच्या उत्पादनांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले.  आगीची माहिती मिळताच मालक प्रमोद मालू व समृद्धी व्हॅल्यू मार्केटिंगचे उपाध्यक्ष अमितकुमार चव्हाण घटनास्थळी पोहोचले. तिन्ही विभागातील कर्मचार्‍यांनी गोदामामधील शिल्लक  माल तातडीने इतरत्र हलविला. त्यामुळे आग पसरली नाही.