Mon, Apr 22, 2019 16:17होमपेज › Sangli › विट्यात सजग नागरिक मंचची स्थापना करणार  : अभय भंडारी 

विट्यात सजग नागरिक मंचची स्थापना करणार  : अभय भंडारी 

Published On: Feb 21 2018 6:03PM | Last Updated: Feb 21 2018 6:03PMविटा : प्रतिनिधी 

आपले हक्क आणि कर्तव्य लोकांना न समजल्याने व्यवस्थेतील लोक गैरफायदा घेत आहेत. परिणामी  केवळ अज्ञानामुळे लोकांची कामे खोळंबतात. विविध शासकिय कार्यालयातून पैशाची मागणी होते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजातील निस्वार्थी व अराजकीय लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठी विटा शहरात सजग नागरिक मंचची स्थापना करणार असल्याची माहिती अभय भंडारी यांनी दिली.

भंडारी म्हणाले, महावितरण पासून मोजणी कार्यालय, नगरपरिषद ते पोलीस ठाणे यासह सर्वच शासकीय कार्यालयात असणारी कामे करताना सामन्यांना अडचणी येतात. सामान्य जनतेला राजकीय मंडळी अथवा प्रशासकीय यंत्रणेला बळी पडावे लागते, नेमकी आपली कामे काय व व्यवस्थेतील लोकांचे अधिकार काय याचे ज्ञान नसल्याने हा प्रकार होतो. लोकांना याचे ज्ञान व्हावे यासाठी प्रबोधन करण्याचे काम सजग नदागरिक मंचच्यावतीने करण्यात येईल. यासाठी काम करू इच्छिणाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन भंडारी यांनी केले 

फक्त लोकच नाही तर नगरसेवकांसारखे लोकप्रतिनिधी देखील कार्यालयातील कामकाज पद्दतीबाबत अमभिज्ञ असतात. त्यांनदेखील प्रशिक्षण देणे देखील गरजेचे आहे. अनेकदा विकास कामांची गुणवत्ता तपासणे अशा विषयातही नागरिकांना सक्षम करण्याचे तसेच , महिला लोकप्रतिनिधींच्या कामात त्यांच्या पतीचा होणारा हस्तक्षेप रोखणे अशी कामे या मंचच्या वतीने केले जाणार आहेत असेही भंडारी यांनी सांगितले