Sun, Aug 18, 2019 20:59होमपेज › Sangli › साईनाथ रानवडे ठरला ‘दिघंची सरपंच श्री’

साईनाथ रानवडे ठरला ‘दिघंची सरपंच श्री’

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 8:15PMआटपाडी  : प्रतिनिधी

दिघंची येथे झालेल्या कुस्ती मैदानात पुणे येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राच्या साईनाथ रानवडे याने न्यू मोतीबाग तालीमच्या बालारफिक शेखला डंकी डावावर अस्मान दाखवित ‘दिघंची सरपंच श्री’चा बहुमानासह  1 लाख 51 हजाराचे बक्षीस व चांदीची गदा पटकावली.  

दिघंची ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी शिरळोबा यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे  आयोजन केले होते. श्रीयाळषष्ठी व नागपंचमी निमित्त आयोजित कुस्तीमैदानास मोठा प्रतिसाद लाभला. मैदानात दुसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या सिकंदर शेखने व तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीत इंदापूरच्या संतोष बाबरने बाजी मारली.  मैदानात सुमारे दोनशेवर लहान -मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. आमदार अनिलभाऊ बाबर, ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पत्की, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जि. प. चे माजी सदस्य तानाजीराव पाटील, सरपंच अमोल मोरे, रावसाहेब मगर प्रमुख उपस्थित होते. 

कैलास मगर (निमगाव), विकास पवार (दिघंची), समाधान जाधव (दिघंची), प्रेरणा गायकवाड (जोंधळखिंडी), गौरी शिंदे (जोंधळखिंडी) यांनी चमकदार खेळ करत कुस्त्या जिंकल्या. उद्घाटन सरपंच अमोल मोरे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष  मुन्नाभाई  तांबोळी  व सहकारी  यांच्या  हस्ते  झाले.  डबल महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर यांनी सरपंच अमोलमोरे व विकास मोरे यांना मानाचा फेटा बांधून सत्कार केला. 

गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून 4 कोटी 7 लाखाचा निधी आणल्याबद्दल आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांचा  सत्कार करण्यात आला. मैदानात प्रथमच महिला कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.  वैष्णवी कदम (इस्लामपूर) ने प्रेरणा गायकवाडचा तर मेघा चव्हाण (इस्लामपूर)ने गौरी शिंदे (जोंधळखिंडी) चा पराभव केला.  रावसाहेब मगर, विष्णूपंत पाटील, नामदेव बडरे, संजय गुरव, जितेंद्र मोरे-पाटील, धनंजय मोरे, मधुकर पवार, रामचंद्र शिंदे, धनंजय बोडरे, संतोष पुजारी, संतोष गाढवे आदींनी पंच म्हणून काम केले. बाळासाहेब होनराव व परशुराम पवार यांनी समालोचन केले. लाईफलाईन आयसीयु सेंटरच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

मोहनभाऊ मोरे, संतोष मोरे, सागर ढोले, संजय वाघमारे, राहुल पांढरे, महेश साळी, नवनाथ रणदिवे, अजिनाथ रणदिवे, झाकिर तांबोळी, हसन तांबोळी, चंद्रकांत माईनकर, डॉ. मनोज जरे, पोपट सूर्यवंशी, मारुती भोसले, सदाभाऊ यादव, गौरीशंकर भोसले, मेजर नानासो जावीर, विठ्ठल बुधावले, सागर मोरे, मंगेश रणदिवे, कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.