Tue, Jan 22, 2019 20:34होमपेज › Sangli › साधू - संतांमुळे देशाची जडणघडण : पंतप्रधान मोदी

साधू - संतांमुळे देशाची जडणघडण : पंतप्रधान मोदी

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:34PMश्रवणबेळगोळ : प्रतिनिधी

भारतीय संस्कृती व जैन धर्मियांची संतपरंपरा सर्वश्रेष्ठ आहे. या संस्कृतीचे  संवर्धन साधू-संत, आचार्य मुनी, त्यागीगण, आर्यिका करीत आहेत. आत्मकल्याणाबरोबरच सुसंस्कार प्रबोधनाच्या माध्यमातून देश व समाजाचे हित जपत आहेत. त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केले.

आचार्य वर्धमानसागर, आचार्य पुष्पदंत सागर महाराज, आर्यिका माताजींचे नम्रपणे नरेंद्र मोदी यांनी नमस्कार करून आशिर्वचन घेतले.  त्यागी-मुनी, आर्यिकांनी शास्त्र जपमाळ देऊन आशिर्वचन दिले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर सैनिक अहोरात्र लढून सुरक्षितता जपत आहेत. तेवढेच हिताचे कार्य मुनी, त्यागीगण गावागावात  विहार करून प्रबोधनाच्या माध्यमातून करीत आहेत. एकता, समता, बंधुता आणि सद्विचारांची शिकवण देत आहेत. या सद्विचारांमुळेच समाजाचे हित जपले जात आहे, असे गौरवोद‍्गारही त्यांनी काढले. चारुकिर्ती भट्टारक स्वामीजी, सरिता जैन, सचिव सुरेश पाटील, महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.